Cultural reporting च्या assignment साठी पद्माकर देशपांडे काकांची मुलाखत घेतली होती . ते winemaker आहेत. विषय interesting वाटला. ते म्हणाले, 'माझ्यासाठी blog लिहून देशील का?'. तर हा त्यांचा blog ...
आसवे आणि अरिष्टे आपल्याला नवीन नाहीत. आयुर्वेदात या द्रव्यांचा औषध म्हणून वापर केला जातो. वाईन बनवायची घरगुती पद्धतही काही प्रमाणात या आसवा- अरीष्टांसारखीच असते. म्हणूनच घरगुती पद्धतीने बनवलेली वाईन औषधी ठरते. यात मुळात घरगुती वाईन आणि बाजारातून विकत घेतलेली कोणतीही दारू (यात विकतची वाईनही आली) यात नेमका फरक कुठला आहे ते समजून घ्यायला हवे.

आपल्याकडे दारू प्रामुख्याने साखर कारखान्यातल्या मळीपासून बनवतात. साखर कारखान्यातली मळी आधी फर्मेंट करायची आणि त्यानंतर ती दोन वेळा डिस्टिल करायची अशी ही साधारण प्रक्रिया असते. डिस्टिलेशनमध्ये त्या द्रवपदार्थाला उष्णता दिली जाते. यात त्यातली जीवनसत्त्वे पार मरून जातात, त्यातले औषधी गुण नष्ट होतात आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण वाढते. या अल्कोहोलच्या बध्लेल्या प्रमाणामुळेच त्याचे व्यसन लागते. शिवाय उसाचा रस केला की त्यातून साखर वेगळी काढेपर्यंत तो रस फर्मेंट होऊ नये म्हणून त्याबर फोस्फोरस acid फवारतात. रस आणि सायरप करताना जंतूंना दूर ठेवण्यासाठी गंधक आणि चुन्याची त्यावर प्रक्रिया करतात. बिअरसारख्या दारूचा फेस तसाच राहावा म्हणून त्यात लेड सारखी काही chemicals मिसळतात. कोणत्याही दारूच्या डिस्टिलेशननंतर ही सगळी द्रव्ये रेसिड्यू स्वरुपात थोड्या प्रमाणात तरी उरतातच. ती सगळी दारूबरोबर पोटात जातात.
घरगुती पद्धतीने बनवलेल्या वाईनमध्ये या हानिकारक द्रव्यांचा वापरच होत नाही. शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही वाईन डिस्टिल करायची नसते. ती नैसर्गिकरीत्याच फर्मेंट करायची असते. त्यामुळे त्यातला अल्कोहोल content कमी राहतो आणि त्याचे व्यसन लागत नाही. घरच्याघरी उपलब्ध असलेल्या साहित्यात ही वाईन बनवता येत असल्याने ती स्वस्तही पडते. तुम्हीही घरच्याघरी वाईन बनवायला शिकू शकता. त्याचा व्यवसाय करून स्वतः वाईनमेकर होऊ शकता. ही वाईन बनवायचे प्रशिक्षण Amateur Winemaker 's Club मध्ये दिले जाते.